ऍशेस ः इंग्लंड ४ बाद १९६

0
103

जेम्स विन्स आणि मार्क स्टोनमन यांनी दमदार अर्धशतकांसह दुसर्‍या विकेटसाठी केलेल्या १२५ धावांच्या शतकी भागीदारीमुळे इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात दिवसअखेरपर्यंत ४ गडी गमावत १९४ अशी धावसंख्या उभारली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार ऍलिस्टर कूक (२) मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तंबुत परतल्याने त्यांना प्रारंभीच झटका बसला. परंतु त्यानंतर जेम्स विन्स आणि मार्क स्टोनमेन यांनी संघाचा डाव सावरताना दुसर्‍या विकेटसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पॅट कमिन्सने ही जोडी फोडली. मार्क स्टोनमन ५३ धावांची अर्धशतकी खेळी करून त्रिफळाचित होऊन परतला. १२ चौकारांनिशी ८३ धावांची खेळी केलेला जेम्स विन्स लीऑनच्या अचूक फेकीवर धावचित झाला. तर जो रुटला (१५) पॅट कमिन्सने पायचितच्या जाळ्यात अडकविले. खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला तेव्हा डेव्हिड मलान २८ तर मोईन अली १३ धावांवर नाबाद खेळत होते.