सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशनास बंदी

0
144

>> विधेयक विधानसभेत मंजूर

 

सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशनास बंदी घालणारे व नियमांचे उल्लंघन केल्यास दहा हजार रुपयेपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद असलेले अबकारी कायद्यास दुरुस्ती सूचविणारे विधेयक काल मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांडले. फेणी हे या राज्याचे वारसा पेय म्हणून जाहीर करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली. अबकारी खात्याने काही दिवसांपूर्वी फेणी हे वारसा पेय म्हणून जाहीर करण्यासंबंधीचा निर्णय घेतला होता. वरील विधेयक संमत झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन केल्यास संबंधीतांवर कारवाई करण्याची विशेष तरतूद नव्हती. त्यामुळे या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास या विधेयकाचा लाभ होऊ शकेल.