मराठी राजभाषा समितीतर्फे १२ रोजी निर्धार दिन

0
79

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषा विधेयक न मांडल्यामुळे मराठी प्रेमीतर्फे या सरकारचा निषेध करण्यात येत आहे. तसेच शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृतीदिन मराठीप्रेमी निर्धार दिन म्हणून पाळणार आहेत. अशी माहिती समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी दिली. या निर्धार दिनानिमित्त मिरामार येथील बांदोडकरांच्या समाधीजवळ दि. १२ रोजी सकाळी ९.३० वा. मराठीप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मराठी ही गोमंतकाची राजभाषा झाली पाहिजे हे बांदोडकर यांचे स्वप्न होते. त्यांची अपुरी इच्छा पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. असे श्री. ढवळीकर म्हणाले.