सांकवाळ-झुवारीनगर येथे तीन मजुरांची आत्महत्या

0
62

सांकवाळ-झुवारीनगर येथील एमईएस कॉलेजसमोरील परिसरात झोपडीवजा चाळीत भाड्याच्या खोलीत राहणार्‍या तिघांनी काल आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आत्महत्या करणारे तिघेही मूळ विजापूर कर्नाटकमधील कामगार आहेत.
काल मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास तिघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करणार्‍यांमध्ये पती, पत्नी व पतीचा भाऊ यांचा समावेश आहे.

ही चाळ याच वस्तीत राहणार्‍या राहणार्‍या समसुद्दिन खान यांच्या मालकीची असून या चाळीशेजारी त्यांचा बंगला आहे. पाच दिवसांपूर्वी खान यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. ही चोरी या तिघांनी केल्याचा त्यांच्यावर संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. मात्र काल अचानक त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.