Home बातम्या सहा आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती

सहा आयएएस अधिकार्‍यांची नियुक्ती

0

केंद्रीय गृह मंत्रालयाने येथील प्रशासनातील रिक्त असलेली आयएएस अधिकार्‍यांची पदे भरण्यासाठी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती करणारा आदेश नुकताच जारी केला आहे.

दिल्लीतील डी. पी. द्विवेदी, एफ. ओ. हश्मी, झेड. यू. सिद्दीकी, जयदेव सारंग, मोहन लाल तर पॉंडिचरी येथील मॅथीव सिमोएल यांची गोव्यात बदली केली आहे. तर माजी अबकारी आयुक्त पी. एफ. रेड्डी यांना आयएएसचा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांची बदली दमण येथे तर रमणमूर्ती यांची नियुक्ती पॉंडिचेरी प्रशासनात करण्यात आली आहे.

शिक्षण, गोवा आर्थिक विकास महामंडळ व अन्य खाती सांभाळण्यासाठी आयएएस अधिकार्‍यांची गरज आहे. गोवा प्रशासनासाठी एकूण १८ आयएएस अधिकार्‍यांची गरज आहे. गोव्यात फक्त दहा आयएएस अधिकारी होते. त्यामुळे प्रत्येक अधिकार्‍यांकडे ८ ते १० खात्यांचा ताबा होता. याचा त्यांच्या कामावरही परिणाम होत होता.