सलमान रश्दींची नेमाडेंवर खालच्या पातळीवर टीका

0
96

दिग्गज मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नामवंत इंग्रजी साहित्यिक सलमान रश्दी यांनी ट्विटरवरून नेमाडे यांच्यावर अश्‍लाघ्य पध्दतीने टीका केल्याने साहित्य क्षेत्रात संताप व्यक्त होत आहे.‘चिडक्या म्हातार्‍या, गुपचूप पुरस्कार घे आणि सभ्यपणे आभार मान. ज्यांच्यावर टीका करता त्यांच्या साहित्याचा एक शब्दही तुम्ही वाचालात की नाही याची शंका वाटते’ असे रश्दी यांनी म्हटले आहे.
बुकर पुरस्कार जिंकल्यानंतर नेमाडे यांनी आपल्यावर व व्ही. एस. नायपॉल यांच्यावर टीका केली होती याची आठवण रश्दी यांनी नेमाडे यांच्यावर टीका करताना दिली आहे. ही टीका करत असताना त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा संदर्भही त्यांनी दिला आहे. ‘पाश्‍चिमात्यांची भलावण करणारे आणि साहित्य मूल्य नसलेले असे रश्दींचे लेखन आहे’ अशी टीका नेमाडे यांनी केली होती. त्यामुळे आता रश्दी यांनी नेमाडे यांना ट्विटरवरून लक्ष्य केले आहे.