पार्सेतील कार – दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी

0
152
पार्से-चावदेवाडा येथे स्वीफ्ट कार व दुचाकी वाहनात झालेला अपघात व अपघातातील वाहने. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

पार्से-चावदेवाडा येथे स्वीफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात अपघात होवून मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात उपचाराचाठी पाठवण्यात आले तर स्वीफ्ट कारमधील परेश नाईक व सीताराम खोर्जुवेकर किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ रोजी सायंकाळी ४.३० वा. तुयेमार्गे स्वीफ्ट कार क्र. जीए- ०३ पी- २२११ जात होती. विरुध्द दिशेने दुचाकी हिरो होंडा मोटरसायकल क्र. जीए- ०३ ए- २९९५ हे वाहन चावदेवाडा पार्से धोकादायक वळणावर पोचताच समोरून येणार्‍या कारने मोटरसायकलला धडक दिली. कारची जबदरस्त धडक दुचाकीला बसून दुचाकीस्वार व मागे बसलेल्या दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका पोचली, दोन्ही जखमीना सुरवातीला म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले. नंतर गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे पाठवण्यात आले.
स्वीफ्ट कारची जबरदस्त धडक मोटरसायकलला बसून दोघे रस्त्याच्या बाजूला सावरीचे झाड व झुडुपे होती, त्यात जखमी अडकले. लोकांनी एका जखमीला तर काट्याच्या झुडुपात खेचून बाहेर काढले. स्वीफ्ट कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. दुचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला.