सलमान खान गोळीबार प्रकरण; पिस्तुल पुरवणाऱ्याची आत्महत्या

0
4

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने बुधवारी आत्महत्या केली. आरोपी अनुज थापन याने मुंबई पोलिसांच्या कोठडीत गळफास लावून घेतला. त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाने पंजाबमधून दोघांना अटक केली होती. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधित असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना दोन पिस्तुले व जिवंत काडतुसे पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर (37) आणि अनुज थापन (32) यांना दक्षिण पंजाबमधून अटक करण्यात आली होती. त्यातील थापनने बुधवारी आत्महत्या केली.