मोदी सरकारकडून उद्योजकांच्या हितासाठी कामगार कायद्यात बदल

0
7

>> कामगार दिनी इंडिया आघाडीच्या नेत्यांचा आरोप

नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारने कामगारांच्या हितासाठी असलेल्या कामगार कायद्यात वेळोवेळी दुरुस्त्या घडवून आणल्या आणि कामगारांच्या हितासाठी असलेले हे कायदे उद्योजकांच्या हितासाठीचे बनवण्यासाठी शक्य ते सगळे काही केले, असा आरोप काल इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून कामगार कल्याण कायद्यांत बदल करण्याचे सत्र आरंभले आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश भोसले म्हणाले.
मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास काँग्रेसने कामगारांच्या कल्याणासाठी जे कायदे तयार केले होते, ते कायदे मोदी सरकार हळूहळू नष्ट करुन टाकेल, अशी भीती काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवणकर यांनी यावेळी व्यक्त केली.