सर्वात उंच रस्त्याचे लडाखमध्ये उद्घाटन

0
43

सामरिकदृष्ट्‌या महत्त्वपूर्ण असलेल्या लडाखमध्ये भारताने जगातील सर्वात उंच रस्ता बांधला आहे. १८,६०० फूट उंचीवर बांधलेला हा रस्ता, लेह (जिगराल-तांगत्से) पासून केला पास ओलांडून पँगॉंग सरोवरपर्यंत ४१ किमीचे अंतर कमी करेल. हा रस्ता लष्कराच्या ५८ अभियंता रेजिमेंटने बांधला आहे. हा रस्ता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. ३० किलोमीटरचा हा रस्ता असून या रस्त्यामुळे लेहवरून चीन सीमेवर पँगॉंग सरोवराच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होणार आहे.
लडाखमधील भाजप खासदार जम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी काल या रस्त्याचे उद्घाटन केले.