डॉक्टर मारहाणप्रकरणी दोघांना सशर्त जामीन

0
52

गेल्या दि. २७ ऑगस्ट रोजी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल तिळवे यांना झालेल्या मारहाणप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी मिनेश नार्वेकर याच्यासह तिघांना पर्वरी पोलिांनी अटक केली होती. एकूण चार आरोपींपैकी दोघांना सशर्त जामीन मिळाला आहे.

सोमवार दि. ३० रोजी रोहील साळगावकर, रोहीश साळगावकर आणि कृष्णा नाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तत्पूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि खासगी डॉक्टरांनी पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन उपाधीक्षक एडविन कुलासो यांची भेट घेऊन त्यांना मारहाण प्रकरणात सामील झालेल्या आरोपीना त्वरित अटक करण्याची जोरदार मागणी केली होती. त्याच दिवशी उपरोल्लेखित तिघांना सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
प्रमुख संशयित आरोपी मिनेश नार्वेकर मंगळवारी दि. ३१ रोजी पोलिसांना शरण आला होता. आरोपींपैकी रोहील साळगावकर आणि रोहीश साळगावकर यांना म्हापसा येथील न्यायदंडाधिका-यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

मिनेश याने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी माध्यमांकडे बाळाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉ. तिळवे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली होती. दरम्यान, या प्रकरणी निरीक्षक निनाद देऊलकर पुढील तपास करीत आहेत.