सरकारी कर्मचार्‍यांसाठी २८% महागाई भत्ता

0
83

गोवा सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना २८ टक्के एवढा महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. गोवा सरकारच्या कर्मचार्‍यांना ऑगस्ट महिन्यांपासून वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच आपल्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्यापासून आपल्या कर्मचार्‍यांना वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे.