सप्टेंबरपर्यंत येणार ‘कोव्हाव्हॅक्स’ लस

0
63

कोरोना विषाणूविरोधात लसीकरणासाठी भारताला लवकरच आणखी एक लस मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी, येत्या सप्टेंबरपर्यंत भारतात नोव्हाव्हॅक्सची कोव्हाव्हॅक्स ही लस येऊ शकते. सध्या देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायाटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पूतनिक व्ही या लशीचा वापर होत आहे. या लशीबाबत माहिती देताना पुनावाला यांनी, या लशीची चाचणी पूर्ण होत आली आहे. रेग्यलेटरीकडून परवानगी मिळाल्यास कोव्हाव्हॅक्स लशीचे उत्पादन भारतात सुरू केले जाऊ शकते, असे सांगितले.

भारतात या लशीच्या चाचण्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकतात. सप्टेंबर २०२० मध्ये, नोव्हाव्हॅक्सने कोव्हाव्हॅक्स या लशीसाठी सीरम संस्थेबरोबर उत्पादन कराराची घोषणा केली होती. कोविड संसर्गाच्या मध्यम आणि गंभीर प्रकरणांत सदर लस १००% परिणामकारक असून या लशीची एकूण कार्यक्षमता दर ९०.४ टक्के आहे. नुकतेच नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी नोव्हाव्हॅक्सची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केली जाईल अशी माहिती दिली होती. फार्मा कंपनी जुलैपर्यंत लहान मुलांवर कोव्होव्हॅक्सच्या चाचणीचा विचार करीत आहे.