भाजप, कॉंग्रेससोबत युती नाहीच : सुदिन

0
52

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत मगो पक्ष भाजप तसेच कॉंगे्रसबरोबरही युती करण्यास इच्छुक नसल्याचे काल मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. मगो पक्षाचे अध्यक्ष व सुदिन ढवळीकर यांचे बंधू दीपक ढवळीकर यांनी मंगळवारीच मगो पक्षासाठी बारा जागा सोडण्यास जो पक्ष तयार असेल त्याच्यासोबत मगोप युती करेल असे म्हटले होते. मात्र, काल त्यांचेच बंधू व मगोचे आमदार तथा ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी ती शक्यता फेटाळून लावताना भाजपने आमच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर युती करण्याचा प्रश्‍नच नसल्याचे स्पष्ट केले.

त्याशिवाय कॉंग्रेस पक्षाबरोबरही युती करण्याबाबत पक्ष विचार करीत नसल्याचे ते म्हणाले. १८ मतदारसंघात मगो पक्षाने चांगले काम केलेले असून तेथे पक्षाचा प्रभाव आहे. आम्ही निवडणूक लढवू शकतो असे खरे म्हणजे २४ मतदारसंघ आहेत. ह्या २४ मतदारसंघांत पक्षाचे अस्तित्त्व आहे, असे सुदिन ढवळीकर यावेळी म्हणाले.