संसदेचे आजपासून पावसाळी अधिवेशन

0
11

संसदेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारी 22 जुलैपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पापूर्वी संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. केंद्र सरकारने बोलावलेल्या या बैठकीत आरोग्यमंत्री आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे जयराम रमेश, आपचे खासदार संजय सिंह, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यासह बडे विरोधी नेते उपस्थित होते. तर ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी त्यात आला नाही. या बैठकीत काँग्रेसने लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली. तसेच त्यांनी नीट विषयावर लोकसभेत चर्चा व्हावी. सपा नेते राम गोपाल यादव यांनी यूपी कावड यात्रा मार्गावरील दुकानांवर नेम प्लेट लावण्याचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बैठकीत जेडीयूने बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केली, तर वायएसआरसीपीनेही आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी केली.