Home बातम्या चांद्रयान-5 मोहिमेसाठी भारत-जपानमध्ये करार

चांद्रयान-5 मोहिमेसाठी भारत-जपानमध्ये करार

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शुक्रवारी जपानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर गेले. यादरम्यान भारत आणि जपान यांच्यामध्ये चांद्रयान-5 मोहिमेसाठी सहकार्य करार झाला. याशिवाय जपानसोबत विविध करारही झाले आहेत. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा आठवा जपान दौरा आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जपान तंत्रज्ञानात एक पॉवरहाऊस आहे, तर भारत प्रतिभेचे पॉवरहाऊस आहे. केवळ तंत्रज्ञान आणि प्रतिभाच नेतृत्व करू शकतात. त्यामुळे भारत आणि जपानमध्ये सहकार्याच्या प्रचंड शक्यता असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी जपानच्या पंतप्रधान इशिबा यांनी, भारतीय प्रतिभा आणि जपानी तंत्रज्ञान एकमेकांसाठी बनले असल्याचे सांगितले.
टोकियोमधील एका हॉटेलमध्ये स्थानिक कलाकारांनी गायत्री मंत्राने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. वार्षिक परिषदेदरम्यान मोदी पंतप्रधान इशिबा यांच्याशी सुरक्षा, संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील. त्यानंतर मोदी जपानमधील मियागी येथील कारखान्याला देखील भेट देतील, जिथे बुलेट ट्रेनचे डबे बनवले जातात. जपानी माध्यमांनुसार, या भेटीदरम्यान, जपान भारतात 10 ट्रिलियन येन म्हणजेच 5.93 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करणार आहे.

ट्रम्प यांनी भारतावर 50% कर लादण्याच्या निर्णयानंतर, मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो.
पंतप्रधान मोदी येथे 15 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा होईल. जपाननंतर मोदी 31 ऑगस्ट रोजी चीनला पोहोचतील.

चांद्रयान-5 करार
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, दोन्ही देशांनी ऊर्जा, खनिजे, डिजिटल तंत्रज्ञान, अवकाश, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यावरण आणि राजनैतिक प्रशिक्षण यासारख्या क्षेत्रात अनेक सामंजस्य करार केले. एकूण एक डझनहून अधिक करार झाले.