Home Featured काले येथील खाणीला पर्यावरण दाखला मंजूर

काले येथील खाणीला पर्यावरण दाखला मंजूर

0

फोमेंतो रिसोर्सिस या कंपनीच्या काले येथील खाणीला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याने पर्यावरण दाखल मंजूर केला असून त्यामुळे ही खाण सुरू होण्यासाठीचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
फोमेंतो रिसोर्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सांगे तालुक्यातील काले येथील खाणपट्ट्यात मंजूर झालेला हा चौथा खाण ब्लॉक आहे. सांतोणा ह्या गावातील ही खनिज लीज असून ती 152.5 हेक्टर एवढ्या क्षेत्रात आहे.

या लिजमध्ये वार्षिक 0.75 दशलक्ष टन एवढे लोह खनिज मिळणार असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान खात्याने 22 ऑगस्ट 2025 रोजी ह्या खाण लिजला पर्यावरणीय मंजुरी दिलेली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी दै. नवप्रभाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यातील 12 खाणी सुरू होणार असल्याची माहिती दिली होती.