श्रीराम सेनेवरील बंदीत साठ दिवसांनी वाढ

0
101

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे श्रीराम सेनेवरील बंदी आणखी साठ दिवसांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन महिने श्रीराम सेनेला गोव्यात कार्य सुरू करणे शक्य होणार नाही. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गोव्यात शाखा स्थापन करून कार्य सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या राजकीय पक्षांबरोबरच अन्य अनेक बिगर सरकारी संघटनांनी श्रीराम सेनेस विरोध केला होता.