Home बातम्या कळंगुटमधील फार्मसी मालकाची ८० लाखांची मालमत्ता जप्त

कळंगुटमधील फार्मसी मालकाची ८० लाखांची मालमत्ता जप्त

0

अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
कळंगुट येथील नॉर्मा फार्मसीचे मालक नॉर्मन आझावेदो यांची ८० लाख रु. ची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. अमली पदार्थ व्यवहार व पैशांच्या घोटाळ्यात त्याचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने वरील कारवाई केली.अंमलबजावणी संचालनालयाच्या गोव्यातील अधिकार्‍यांनी आझावेदी यांच्या बँकेतील ठेवी व पॉलिसी जप्त केल्या असून त्या सुमारे ८० लाख रु. च्या असल्याचे वृत्त आहे.
याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने नॉर्मन आझावेदो व त्याचा कर्मचारी आर. पाटील यांच्या विरुद्ध ‘मनी लँडरिंग प्रतिबंध कायद्याखाली गेल्या फेब्रुवारी महिन्यात गुन्हा नोंदवला होता. आझावेदो यांनी बंदी असलेल्या औषधांची कथित विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशांतून स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. २००९ साली नॉर्मन आझावेदो यांना अमली पदार्थ व्यवहारात गुंतल्याप्रकरणी जकात खात्याने अटक केली होती. तसेच सीबीआयने गेल्या जून महिन्यात त्यांच्या घरावर छापा मारून ३ कोटी २८ लाख रु. चे विदेशी चलन जप्त केले होते.