Home बातम्या …तेव्हा आरक्षण रद्द होईल : पर्रीकर

…तेव्हा आरक्षण रद्द होईल : पर्रीकर

0
…तेव्हा आरक्षण रद्द होईल : पर्रीकर

ज्या दिवशी मागास जाती-जमातींच्या लोकांना आरक्षणाचा लाभ घेणे कमीपणाचे वाटेल त्यावेळी तोच समाज समानपातळीवर आल्याचे सांगेल व त्यावेळी आरक्षण रद्द होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठराविक काळासाठी आरक्षण ठेवले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकीर्दीतही दहा वर्षे आरक्षण वाढविले होते. गरजेनुसार त्यात वाढ केली जात आहे. एक दिवस या देशातील आरक्षण जाणारच, असे पर्रीकर यांनी सांगितले.