शेळ-मेळावली आंदोलकांवरील त्वरित मागे घ्या : कॉंग्रेस

0
125

गोवा सरकारने शेळ -मेळावली येथील आयआयटी आंदोलनाच्यावेळी आंदोलनकर्त्यांवर जे खटले दाखल केले होते ते त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केली.

आयआयटी आंदोलनात भाग घेतलेल्या शेळ-मेळावली येथील पूजा मेळेकर या युवतीने गोवा विद्यापीठात ‘ऍनालिटिकल केमेस्ट्री’ या विषयात सर्वाधिक गुण मिळवून गोव्यात प्रथम येण्याचा जो मान मिळवला आहे त्याबद्दल पूजा मेळेकर हिचे अभिनंदन करताना कामत यांनी वरील मागणी केली. सरकारने वरील प्रकरणी पूजा मेळेकर हिच्यावरही खटला दाखल केलेला असून तिच्यासह सर्वांवरील खटले राज्य सरकारने आता मागे घ्यावेत, अशी मागणी कामत यांनी केली आहे.

सरकारने खटले मागे घेणे गरजेचे असून पूजा मेळेकर हिच्यावरील खटला मागे घेतल्यास तिच्या कामगिरीबद्दल तिला दिलेले ते बक्षीस ठरणार असल्याचेही कामत यांनी म्हटले आहे.

इंट्रानेट सेवा कार्यान्वित करा
यंदाचे शैक्षणिक वर्ष सोमवार दि. २१ पासून सुरू झालेले असतानाच राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेस सरकारच्या काळात गोव्याला भेट दिलेली इंट्रानेट सेवा कार्यान्वित करण्याची मागणी कामत यांनी केली आहे. सर्व पंचायतींच्या दारात पोचलेली सदर ऑप्टिक फायबर केबल संच कार्यान्वित केल्यास विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचा प्रश्‍न सुटणार आहे. सरकारला सातत्याने याची जाणीव दिलेली असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कामत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.