विरोधी १५ पक्षनेत्यांची दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक

0
93

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत साधारण १५ विरोधी पक्षनेत्यांचा सहभाग होता. पण ही बैठक कोणतीही राजकीय स्वरूपाची नव्हती अशी माहिती बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी दिली.

मेमन यांनी, या बैठकीत विशेष करून, राष्ट्रीय मंचाची जी विचारसरणी आहे व जो कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत चर्चा झाली. ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली पण ती पवारांनी बोलावली नव्हती. ही बैठक राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती असे सांगितले.