शुक्रवारी आढळले गेल्या ४६ दिवसांतील कमी कोरोनाबाधित

0
111

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्ण आढळले असून गेल्या ४६ दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशभरात ३४६० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सलग १० व्या दिवशी करोना संसर्गाचा दर हा देशात १० टक्क्यांच्या खाली आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशात सध्या २१ लाख १४ हजार ५०८ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ७६ हजार ३०९ नागरिक कोरोनामुक्त मुक्त झाले असून सलग १७ व्या दिवशी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत.