शिवसेनेशी युतीबाबत अद्याप निर्णय नाही : वेलिंगकर

0
63

शिवसेना व गोवा प्रजा पार्टी अशा दोन पक्षांनी माध्यम प्रश्‍नी भारतीय भाषा सुरक्षा मंचला आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे. मात्र, या पक्षांशी युती करण्यासंबंधी अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही असे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी काल स्पष्ट केले.

दरम्यान, युतीसाठी मगोला ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिलेली असून २ ऑक्टोबर रोजी भाभसुमं पर्याय जाहीर करणार आहे. दरम्यान, भाभासुमंने नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला असून पक्षाची ध्येय धोरणे, पक्षाचे नाव व अन्य बाबी ठरवण्यासाठी भाभासुमंचच्या राजकीय विभागाचे प्रमुख ऍड. उदय भेंब्रे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केलेली आहे. ही समिती पक्षाची ध्येय धोरणे व अन्य तपशील तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय समितीकडे सुपूर्द करणार असल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.
चिन्ह मिळणार नाही
भाभासुमंने राजकीय पक्ष स्थापन केला तरी या निवडणुकीसाठी पक्षाला चिन्ह मिळू शकणार नाही. कारण चिन्ह मिळण्यास सहा ते आठ महिने लागत असल्याचे ते म्हणाले. मात्र, या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग पक्षाला एक तात्पुरते चिन्हे देऊ शकते, असे सांगून त्यावरच निवडणूक लढवावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाभासुमंची परवा बैठक
दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर भाभासुमंचची एक महत्त्वाची बैठक परवा १६ रोजी होणार असल्याची माहितीही सुभाष वेलिंगकर यांनी दिली.