काराय-शिरोडा फोंडा येथे हमरस्त्यावर काल सायंकाळी ५ च्या दरम्यान झालेल्या वाहन अपघातात संयोग सुभाष तोरसकर (१९) राहणार हळदोणा या कॉलेज विद्यार्थ्यांचा अंत झाला.
विद्यार्थी शिरोडा येथील रायेश्वर इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयात शिकत होता. जीए ०८ एल ७४३६ नंबरच्या मोटरसायकलने घरी जात असताना समोर ओमनी मारुती गाडीला धडक बसून तो उसळून खाली पडला.
इस्पितळात नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. फोंडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक परेश नाईक यांनी या अपघाताचा पंचनामा केला. अधिक चौकशी तेच करीत आहेत.