नावेली मडगाव येथील ट्रक व मोटरसायकल अपघातात मोटरसायकलवरील संघर्ष सुदेश गोवेकर (कोलवा) व सादिक अब्दुल रझाक मनावली (धर्मापूर) हे दोघे जागच्या जागी ठार झाले. ही घटना दुपारी तीन वाजता झाली. कित्येक घरफोड्या व महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून नेण्याच्या प्रकरणी पोलीस त्यांच्या शोधात होते.
जीए ०६ टी १४०८ क्रमांकाचा ट्रक रावणफोंड येथून नावेली येथे निघाला होता. त्या विरुद्ध दिशेने स्वीफ्ट कार येत होती त्यामागून जीए ०८ एस ५८३५ क्रमाकांच्या पल्सरवरून संघर्ष गोवेकर व सादिक मनावली हे भर वेगाने निघाले होते. स्वीफ्ट कारला मागे टाकून पुढे जात असता त्यांचा ताबा गेला व ट्रकला धडक दिली. त्या धडकेने डोके आपटून ते ठार झाले. पोलिसांनी तात्काळ जावून, त्या दोघांना हॉस्पिटलात नेले व तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.