शिकाऊ डॉक्टरांना कोवीड वॉर्डांत नेमणार ः आरोग्यमंत्री

0
122

सरकारी इस्पितळांतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कोविड वॉर्डांतील डॉक्टरांवर प्रचंड ताण आलेला आहे. राज्यातील वैद्यकीय सेवेत वाढ करण्यासाठी गोमेकॉच्या १३० शिकाऊ (इंटर्न) डॉक्टरांना सेवेत घेण्याचा विचार सुरू आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले.
गोमेकॉच्या निवासी डॉक्टरांनी गोमेकॉच्या डीनना सादर केलेल्या निवेदनात कोविड वॉर्डातील डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येमुळे वैद्यकीय सेवेवर ताण येत असल्याचे निदर्शनास आणले आहे, त्यासंदर्भात ते बोलत होते.

कोरोना महामारीमुळे राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्य्ेमुळे खाटांची संख्या वाढवावी लागत आहे. वॉर्डात क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना दाखल करून घ्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना मदत करण्यासाठी शिकाऊ डॉक्टरांची सेवेचा वापर करण्यावर विचार केला जात आहे. आरोग्य सचिव, मुख्यमंत्री यांच्याशी या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.