शपथग्रहणाने संसदीय अधिवेशन सुरू

0
129

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहणाने कालपासून प्रारंभ झाला. सभागृहाचे नेते म्हणून सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर सभागृहात विविध लक्षवेधी घटना घडल्या. पंतप्रधान मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधी कोठे आहेत असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या सदस्यांच्या दिशेने अंगुली निर्देश करीत विचारला. तर पंतप्रधान मोदी यांचे नाव शपथविधीसाठी पुकारले जाताच भाजप सदस्यांनी ‘मोदी…मोदीचा’ नारा लावला.

सुरूवातीच्या सत्रात शपथग्रहण होत असताना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. अलिकडे ते सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती टाळत होते. या पार्श्‍वभूमीवर रामदास आठवले यांनी राहुल गांधी कोठे आहेत असा टोमणा लगावला. त्यावर कॉंग्रेसच्या नेत्यांनी काही वेळानंतर राहुल सभागृहात येतील अशी माहिती दिली. त्याप्रमाणे राहुल गांधी संध्या. ४ वा. सभागृहात आले व नंतर अर्ध्यातासात त्यांनी शपथ घेतली. विशेष म्हणजे शपथ घेतल्यानंतर रजिस्टरमध्ये सही करण्यास ते विसरले व ते लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सही केली.