वैष्णोदेवीचा प्रसाद यापुढे देशभरात घरपोच

0
105

माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणे सध्याच्या कोरोनाविषयक निर्बंधांमुळे शक्य नसलेल्या देशभरातील कोट्यवधी भाविकांसाठी आता देवीचा प्रसाद पोस्टाने घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जम्मूमधील प्रसिद्ध त्रिकुट पर्वतावरील हे देवस्थान गेल्या १६ ऑगस्टला खुले झाले आहे. कोरोनामुळे ते पाच महिने बंद ठेवण्यात आले होते.

वैष्णोदेवी विश्वस्त मंडळाने आता टपाल खात्याशी एक करार केला असून देशभरातील ज्या भाविकांना हवा असेल त्यांना माता वैष्णोदेवीचा प्रसाद घरपोच पाठवला जाणार आहे. तीन प्रकारचा प्रसाद ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरपोच पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठीे देवस्थानच्या संकेतस्थळावर मागणी नोंदवता येईल किंवा ९९०६०१९४७५ या मोबाईल क्रमांकावरही मागणी नोंदवता येईल. देवस्थानातील यज्ञशाळेत भाविकांच्या अनुपस्थितीत हवन किंवा पूजा करण्याची व्यवस्था देवस्थानने यापूर्वीच उपलब्ध केली आहे.