वेर्णा-उतोर्डा बायपासवर अपघातात लष्करी कर्मचारी ठार

0
108

वेर्णा उतोर्डा बायपास जंक्शन समोर झालेल्या भीषण अपघातात लष्करी दलाचा कर्मचारी मोक्रा स्वामी हा मरण पावला तर दुचाकी चालक प्रशांत पालकोंडा हा गंभीर जखमी झाला.

काल दुपारी १ वाजता मेरशी बांबोळी येथील प्रशांत (२६) आपल्या पल्सर दुचाकी (क्र. जीए ०१ वी १८२७) व त्याचा मित्र मोक्रा स्वामी मडगावाहून पणजीच्या दिशेने येत होते. वेर्णा उतोर्डा जंक्शनकडे पोचले असता प्रशांत याने त्याच्या दुचाकीपुढे असलेल्या एका चार चाकीला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणार्‍या बसचा (क्र. केए एसी ४१४३) टक्कर
झाली.
धडक जबरदस्त असल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या या दोन्ही दुचाकीवरील मोक्रा स्वामी व प्रशांत पालकोंडा यांना तातडीने गोमेकॉ हलविण्यात आले. मोक्रा स्वामी हा इस्पितळात नेत असताना वाटेतच मरण पावला तर प्रशांत हा गंभीर जखमी आहे. मोक्रा स्वामी हा मूळ आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती दिली असता तो बांबोळी येथील लष्करी वसाहतीत राहत होता असे सांगण्यात आले.