‘वुमन्स चॅलेंजर’ मिनी आयपीएल आजपासून

0
141

महिला क्रिकेटपटूंसाठीची ‘मिनी आयपीएल’ स्पर्धेस आजपासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे यंदाची ही स्पर्धा यूएईत खेळविली जाणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी स्पर्धेची अंतिम लढत होईल. सर्व सामने शारजात खेळविले जातील.

ट्रेलब्लेझर्स, वेलोसिटी आणि सुपरनोवाज या तीन संघांमध्ये स्पर्धा होणार असून एकूण ४ सामने खेळविले जातील. ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व स्मृती मानधना, वेलोसिटीचे मिथाली राज तर सुपरनोवाजचे नेृतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. स्पर्धेची शुभारंभी लढत आज सुपरनोवाज आणि वेलोसिटी यांच्यातील लढतीने होईल. ५ नोव्हेंबर रोजी वेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स तर ७ रोजी ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोवाज यांच्यात लढत होणार आहे. स्पर्धेत भारतातील खेळाडूंबरोबरच इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशातील खेळाडूंचाही समावेश असेल.

गेल्या वर्षी भारतात झालेल्या या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोवाज संघाने सर्व सामने जिंकत अजिंक्यपद पटकाविले होतेे. हरमनप्रीत गेल्या वर्षीच्या स्पर्धेत जबरदस्त लयीत होती. तिने तीनपैकी दोन सामन्यात अर्धशतके नोंदविली होती. अंतिम सामन्यात तिने ३७ चेंडूंत ५१ धावांची अर्धशतकी खेळी करीत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती. भारताच्या टी-२० संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत यंदाही धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रयत्नशील असेल. सुपरनोव्हाज संघाने गेल्या दोन्ही पर्वाचे जेतेपद प्राप्त केलेले असून आता त्यांचे लक्ष्य जेतेपदांच्या हॅट्‌ट्रिकवर असेल.

स्पर्धेतील संघ

सुपरनोवासः हरमनप्रती कौर(कणर्धार), जेमिमा रॉड्रिग्ज (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला सिरिवर्दने, पूनम यादव, शकेरा सेल्मन, अरुंधर्त सोनी, आयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.
ट्रेलब्लेझर्स ः स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), सिम्रन दिल बहादूर, सलर्म डॉटीन आणि केशवी गौतम.
वेलोसिटी ः मिताली राज ( कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका विद्या, सुश्री दिव्यादर्शनी, मनाली दक्षिणी, केसपेरेक, डॅनियल आलम आणि एम. अनागा.