Home बातम्या विविध खात्यांना आदेश जारी

विविध खात्यांना आदेश जारी

0

मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात खर्च होत होता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या संख्येत कपात करण्याचा प्रस्ताव असल्याने या व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेण्यास पोलीस प्रमुखांना सांगण्यात आले आहे. सर्व महामंडळाचा अहवाल सादर करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आपण सांगितल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी गोवा कला अकादमीच्या अध्यक्षांचा राजीनामा सादर केल्याचे श्री. पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. मंगळवारपर्यंत अन्य संस्थांचा अहवाल उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रादेशिक आराखडा २०२१ ची कायदेशीर स्थिती काय आहे यासंबंधीची माहिती सादर करण्याचे आदेश नगर नियोजन मंडळाला दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

रस्त्याच्या बाजूला होत असलेले प्लास्टिकचे ढीग कमी करण्यासाठी काय करणे शक्य आहे याची माहिती देण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून त्याचप्रमाणे साबांखाच्या थकबाकीसंबंधीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

मागास जाती जमाती व इतर मागासवर्गियांसाठी आरक्षित असलेल्या पदांचीही माहिती घेण्याचे आपण ठरविल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. मलेरिया कर्मचार्‍यांचा प्रश्‍नही दोन महिन्यांत सोडविणार असल्याचे ते म्हणाले.