Home बातम्या गोवा सांभाळील असा एकमेव नेता पर्रीकर : मिकी

गोवा सांभाळील असा एकमेव नेता पर्रीकर : मिकी

0

मनोहर पर्रीकर यांच्यासमवेत सन २००२ मध्ये थोडे फार काम केले असल्याने त्यांच्या क्षमतेची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. गोवा सांभाळील असा एकमेव नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो, असे कौतुक गोवा विकास पक्षाचे नेते मिकी पाशेको यांनी पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना केले.

या सरकारकडून आपण कोणत्या पदाची अपेक्षा करता का, असे विचारले असता, ते चार भिंतींआड ठरेल, उघड करता येणार नसल्याचे त्यांनी हसत हसत सांगितले.