आपले स्वतःचे शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये झाले असून त्या आपल्या ख्रिस्ती विद्यालयाचा आपल्याला अभिमान आहे. त्या हायस्कूलमधून माजी विद्यार्थी म्हणून दोन वेळा आपल्याला निमंत्रण आले होते व आपण तेथे जाऊन आल्याचे अडवाणी यांनी सांगितले. तेथे दोन वेळा आपल्या झालेल्या स्वागताने आपण भारावून गेल्याचे ते म्हणाले.
मनोहर पर्रीकर हे एक कुशल प्रशासक असल्याचे यावेळी अडवाणी म्हणाले. त्यांनी यापूर्वीच आपली क्षमता सिद्ध करून दाखवली असल्याचे कौतुकही अडवाणी यांनी केले. गोव्याच्या जनतेला चांगले सरकार देण्याची गरज असून चांगले सरकार म्हणजे प्रामाणिक सरकार, असे ते उद्गारले.