विनाअनुदानित घरगुती सिलिंडर २५ रु.नी महाग

0
34

विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलिंडरच्या किमतीत काल बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० प्रतिलीटर असेल. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतही प्रति सिलिंडर ७५ रुपयांनी वाढ झाली आहे.

मुंबईत घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर आता ८८४.५ रुपये, चेन्नईमध्ये ९००.५० रुपये भरावे लागणार आहेत.

सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी काढून टाकली गेली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे.

पेट्रोल-डिझेल दरात कपात
अनेक दिवस अपरिवर्तित राहिल्यानंतर काल बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १३-१५ पैशांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलची प्रतिलीटर किंमत आता १०१.३४ रुपये आणि मुंबईत १०७.३९ रुपये प्रतिलीटर आहे.