Home Featured विधानसभेची आगामी निवडणूकलढवणार : रोहित मोन्सेरात

विधानसभेची आगामी निवडणूकलढवणार : रोहित मोन्सेरात

0

गोवा विधानसभेची 2027 मध्ये होणारी निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती पणजीचे विद्यमान नगरसवेक तथा माजी महापौर रोहित मोन्सेरात यांनी काल पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पणजी महापौरपदासाठी रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदासाठी वसंत आगशीकर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे काल सादर केले. या दोन्ही पदांसाठी दि. 30 मार्च रोजी होणार आहे. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात न आल्याने त्या दोघांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपला आताचा महापौरपदाचा कार्यकाळ अल्प असणार आहे. विधानसभेची 2027 मधील निवडणूक लढविण्याची तयारी आपण सुरू केली आहे. भाजपकडून उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही रोहित मोन्सेरात यांनी सांगितले. यापूर्वी, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी रोहित मोन्सेरात यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार करण्याची योजना असल्याचे एका मुलाखतीत जाहीर केले होते.