विदेशींविना आय लीग शक्य ः दास

0
129

 

विदेशी खेळाडूंविना आय लीग शक्य असल्याचे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सरचिटणीस कुशल दास यांनी काल सोमवारी बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांनी आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले.

२०२०-२१चा आय लीग मोसम वेळापत्रकानुसार खेळविण्याचे महासंघाचे मत असल्याचे ते म्हणाले. आय लीग स्पर्धा समितीचे चेअरमन सुब्रता दत्ता यांनी सहमती दर्शवली तर विदेशी खेळाडूंविना स्पर्धा होणार असल्याचे ते म्हणाले. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा असल्यामुळे विदेशी खेळाडू उपलब्ध होण्याची शक्यता फार कमी असली तरी याचा परिणाम स्पर्धेवर होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिली. पुढील पाच वर्षांत भारताच्या वरिष्ठ फुटबॉल संघाला एखादा भारतीय खेळाडूच प्रशिक्षक म्हणून लाभेल, असे भाकित त्यांनी वर्तविले.

बिबियानो फर्नांडिस, शण्मुगम व्यंकटेशसारखे वेगाने परिपक्व होत आहेत. त्यांच्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक होण्याची क्षमता आहे, असे मत दास यांनी व्यक्त केले. भारताचे माजी खेळाडू व्यंकटेश हे सध्या मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांचे साहाय्यक म्हणून काम पाहत आहेत तर बिबियानो हे १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक आहेत. बिबियानो यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आहे. आम्ही १० ते १२ प्रशिक्षकांना नेदरलँड्‌स व जर्मनी येथे अद्ययावत प्रशिक्षणासाठी पाठविणार आहोत. या वर्षापासून सुरूवात ही सुरुवात होणार होती. परंतु, आता पुढील वर्षापासून हा प्रयोग केला जाईल. यातून निश्‍चितच चांगले फळ मिळेल, असा विश्‍वास दास यांनी व्यक्त केला.