वाहतूकविषयक समितीवर सुदिन ढवळीकरांचा समावेश

0
79

केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती असल्याचे ठरविले असून त्यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यात आपला समावेश असल्याचे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. या समितीची पहिली बैठक दिल्लीत गेल्या २९ रोजी घेण्यात आली. तर पुढील बैठक लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले. मोटर वाहन कायद्यातील नियमामध्ये सुसुत्रता आणून ते सोपे करणे हा हेतू आहे, असे ढवळीकर म्हणाले.