‘वायू’च्या भीतीने चीनची जहाजे भारताच्या आश्रयाला

0
106

संभाव्य चक्रीवादळ ‘वायू’ पासून वाचण्यासाठी चीनची दहा जहाजे भारताच्या आश्रयाला आली असून या जहाजांना रत्नागिरीच्या बंदरावर आश्रय देण्यात आला आहे. भारतीय तटरक्षक महानिरीक्षक के. आर. सुरेश यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय तटरक्षक विभागाने या दहा जहाजांना सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीत राहण्यास परवानगी दिली आहे. हवामान खात्याच्या मते अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वायू हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारी भागास १३ जून रोजी धडकण्याची शक्यता आहे.