वायू’चा सामना करण्यासाठी अमित शहांनी घेतली बैठक

0
98

‘संभाव्य चक्रीवादळ ‘वायू’ला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असून काल गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांसह हवामान विभागाशी निगडीत संस्थांच्या अधिकार्‍यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अमित शहा यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना संभाव्य चक्रीवादळापासून नागरिकांना कोणतेही नुकसान होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्याचे निर्देश दिले. याशिवाय वीज,

टेलिफोन, आरोग्य व पिण्याचे पाणी या गरजेच्या सेवांची उणीव भासणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितले. नुकसानग्रस्त भागात या सेवा खंडित होताच त्या तत्काळ पूर्ववत केल्या जाव्यात, २४ तास अधिकारी नियंत्रण कक्षाद्वारे या चक्रीवादळावर बारकाईने लक्ष ठेवतील. तिन्ही सैन्य दलांचे हेलिकॉप्टर्स सज्ज असतील असे त्यांनी सांगितले.

वायू चक्रीवादळ पुढील १२ तासांमध्ये गोवा व मुंबईच्या किनारपट्टीस धडकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ते गुजरातच्या दिशेने जात असल्याचेही माहिती समोर आली आहे.