वागातोर समुद्र किनाऱ्यावर गुजरात राज्य नोंदणीकृत असलेले पर्यटकांचे वाहन समुद्रात वाहून गेल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात नोंदणीकृत असलेले वाहन चालकाने धुण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर नेले होते. मात्र, त्याचवेळी भरती आल्याने सदर वाहन पाण्याच्या प्रवाहासोबत समुद्रात ओढले गेले. ही घटना घडताच समुद्रकिनाऱ्यावर एकच तारांबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहन पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले. तसेच निष्काळजीपणाबद्दल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.