वरिष्ठ श्रेणीतील १७ अधिकार्‍यांना बढती

0
99

राज्य सरकारने एका आदेशाद्वारे राज्यातील वरिष्ठ श्रेणीतील १७ अधिकार्‍यांना बढती काल दिली आहे. बढती मिळालेल्या अधिकार्‍यांमध्ये बिजू नाईक, सुरेंद्र नाईक, जॉन्सन फर्नांडिस, अजित पंचवाडकर, आग्नेल फर्नांडिस, दशरथ रेडकर, नारायण गाड, देविदास गावकर, फ्लोरिना कुलासो, अजित पावसकर, सिध्दी हर्ळणकर, स्नेहल नाईक गोलतेकर, विनायक वळपईकर, मेघना शेटगावकर, दर्शना नारूलकर, आशुतोष आपटे आणि पराग नगर्सेकर यांचा समावेश आहे.