सलग पाचव्या दिवशी मुसळधार

0
100

>> अजून तीन-चार दिवस पावसाची शक्यता

राज्यातील विविध भागात सलग पाचव्या दिवशी जोरदार कोसळत आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस आणखी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जोरदार पावसामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत. राज्यात मागील चार दिवसांत आतापर्यत एकूण १७.५४ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, चोवीस तासांत ४.८४ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील पाच ते सहा विभागात अंदाजापेक्षा जास्त पावसाची नोंद होत आहे. चोवीस तासांत पेडणे येथे सर्वाधिक ७.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे. तसेच, सांगे येथे ७.१५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

समुद्रातील कमी दाबाचा पट्टा वेगवेगळ्या ठिकाणी सरकत आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात आत्तापर्यंत ६३.१९ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण १४ टक्के जास्त आहे.

म्हापसा येथे ४.१७ इंच, पणजी येथे ४.८१ इंच, ओल्ड गोवा ४.८१ इंच, साखळी येथे ४.६२ इंच, काणकोण येथे ४.०३ इंच, दाबोली येथे ३.९३ इंच, मुरगाव येथे ३.०७, केपे येथे ४.८३ इंच पावसाची नोंद झाली. वाळपई आणि फोंडा येथील पावसाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.