वजन-मापे खात्यातील पदभरतीत घोटाळ्याचा आरोप

0
95

राज्याच्या वजन आणि मापे खात्यातील तीन निरीक्षकांची पदे भरण्याचा प्रक्रियेत घोटाळा झाला असून या प्रक्रियेची दक्षता खात्यातर्फे चौकशी करण्याची मागणी गोवा फॉर्वर्डचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
वरील तीन पदांच्या भरतीसाठी डिसेंबर २०१५मध्ये जाहिरात प्रसिध्द झाली होती. त्यानुसार २७३ उमेदवारांचे अर्ज आले होते. लेखी परिक्षेत खात्याचे मंत्री मिलिंद नाईक यांच्या स्वीय सहाय्यकासह तिघेही उमेदवार वास्कोतील निवडले आहेत. त्यांना अनुक्रमे लेखी परिक्षेत ८४,८५ व ६२ गुण मिळाले होते व अन्य उमेदवारांना ५० पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे लेखी परिक्षेचा पेपर फुटल्याच्या संशयास बराच वाव आहे. त्यामुळे सदर प्रश्‍नपत्रिका कुणी तयार केली होती ? त्याची तपासणी कुणी केली होती याची चौकशी करण्याची गरज
आहे.
लोकायुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करावी अन्यथा, आठ दिवसानंतर गोवा फॉर्वर्ड लोकायुक्तांसमोर तक्रार करणार असल्याचे तिंबले यांनी सांगितले.