लाच मागितल्या प्रकरणी अधिकारी निलंबित

0
3

राज्य सरकारच्या एका खात्यात कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्यासाठी एक अधिकारी 1 लाख रुपयांची लाच मागत असल्याचा ऑडिओ क्लिप मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र तो अधिकारी नेमका कोण हे स्पष्ट झाले नव्हते. काल हा अधिकारी कोण हे समोर आले. त्यानंतर राज्य सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. सदर अधिकारी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) खात्याचा उपसंचालक आहे.

सविस्तर माहितीनुसार, सरकारच्या एका खात्यात कंत्राटी पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्याला साधारण महिना 75 हजार रुपये पगार मिळणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या युवकाकडे 1 लाख रुपयांची मागणी करीत असल्याचे सदर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर समोर आले होते. नोकरी देण्यापूर्वी 50 हजार रुपये आणि नोकरी दिल्यानंतर 50 हजार रुपये देण्याची सूचना सदर अधिकारी करत होता. कंत्राटी पद्धतीवरील नोकरीचे दरवर्षी नूतनीकरण केले जाणार आहे, असेही अधिकारी त्या युवकाला सांगत असल्याचे संभाषणातून स्पष्ट होत होते. ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत होती. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सदर लाचखोर अधिकारी कोण हे तर शोधलेच, शिवाय त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली.