राम मंदिर उडवण्याची ‘अल कायदा’ची धमकी

0
15

अयोध्येत बांधण्यात येणार्‍या भव्य राम मंदिरावर अतिरेक्यांची वक्रदृष्टी पडली आहे. अल कायदा या कुख्यात अतिरेकी संघटनेने आपल्या मुखपत्राद्वारे हे मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. अल कायदाने आपल्या ‘गझवा ए हिंद’ नियतकालिकाच्या डिसेंबरच्या आवृत्तीत राम मंदिराच्या जागी भव्य मशीद बांधण्याचा इशारा दिला आहे.

‘गझवा ए हिंद’ नियतकालिकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही गरळ ओकण्यात आली आहे. तसेच भारतीय मुस्लिमांना जिहादचे समर्थन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. बाबरी मशिदीच्या पायावर बांधण्यात येणारे राम मंदिर पाडून मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद पुन्हा बांधली जाईल. मुस्लिमांनी आतापर्यंत खूप काही सहन केले आहे. त्यामुळे आता त्यांनी कोणत्याही प्रकारच्या नुकसानीला घाबरू नये, असे अल कायदाने ११० पानी गझवा ए हिंदच्या माध्यमातून म्हटले आहे.