Home बातम्या दोन कारवायांमध्ये १० लाखांचे ड्रग्स जप्त

दोन कारवायांमध्ये १० लाखांचे ड्रग्स जप्त

0

गोवा पोलिसांनी अमलीपदार्थ प्रकरणातील दोन कारवायांमध्ये सुमारे १०.५ लाख रुपयांचा अमलीपदार्थ जप्त करत काल दोघांना अटक केली.

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने बागा कळंगुट येथे छापा टाकून एका व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून सुमारे ५.१० लाख रुपये किमतीचे ५१० ग्रॅम हशिश तेल जप्त केले. या प्रकरणी सत्यप्रकाश जानोआ (२९ वर्षे, रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने पत्रादेवी येथे छापा टाकून ५ लाख रुपये किमतीचा ५.५० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी साजिद सनदी (३१ वर्षे, रा. सावंतवाडी) याला अटक केली आहे.