राज्यात गुरुवार ६ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण ३ लाख ६९ हजार ८४९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. या लशीचा पहिला डोस २ लाख ९० हजार २०५ आणि दुसरा डोस ७९ हजार ६४४ नागरिकांना देण्यात आला आहे. राज्यात सध्या लशीचे १ लाख ५६ हजार ६२० डोस उपलब्ध आहेत. राज्यात चोवीस तासांत आणखी ४४४४ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आला आहे. सुमारे २ हजार ९५४ नागरिकांना लशीचा पहिला डोस आणि १ हजार ४९० नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.