तिसर्‍या लाटेबाबत खबरदारी घ्या

0
135

>> सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशातील परीस्थिती बिघडत चालली आहे. त्यातच तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेचा धोका वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खबरदारीचा इशारा दिला आहे. न्यायालयात देशातील प्राणवायूच्या संकटाबाबत सुनावणी घेण्यात येत आहे. याबाबत काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारला काही सूचना केल्या. हा विषय अखिल भारतीय पातळीवर पाहण्याची गरज आहे. प्राणवायूचे ऑडिट करणे आवश्यक आहे. तिसरी लाट येण्याची चर्चा आहे, अशा परिस्थितीत तिसर्‍या लाटेत डॉक्टर आणि परिचारिका थकलेल्या असतील. तेव्हा काय करणार? काही बॅकअप तयार करावा लागेल असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला निर्देश दिले.

लॉकडाऊनबाबत विचार ः नीती आयोग
देशाला कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मोठा फटका बसला असून अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाऊनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत. बुधवारी नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत लॉकडाऊनच्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याची माहिती दिली.

लसीकरणाचा वेग कमी
करू नका ः पंतप्रधान

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पायाभूत आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी राज्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश दिले. राज्यांना लसीकरणाचा वेग कमी करू नका. संवेदनशील बनून काम करण्यावर भर देण्याचे आवाहन केले आहे.