राज्यात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६०० खाली

0
185

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ३९ कोरोना रुग्ण आढळून आले. तर, आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६०० च्या खाली आली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,४५२ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९५ एवढी झाली आहे.

कोरोना बळींची एकूण संख्या ७७७ एवढी आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये फोंडा येथील ७२ वर्षीय महिला रुग्णाचे निधन झाले. सदर महिलेला रुग्णाला ४ फेब्रुवारीला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
कोरोना पॉझिटिव्ह आणखी १२७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण ५२ हजार ७८० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ४२ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

चोवीस तासांत १५७० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २.४८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. केपे येथे सध्याच्या रुग्णांची संख्या ४१ आहे.